
अंडर ग्राऊंड फिल्मस् प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत या चित्रपटाचे शुटिंग नुकतेच मुंबई आणि गोवा अशा निसर्गरम्य परिसरात पूर्ण झालेले आहे. या धमाल विनोदी कथेमध्ये आणखी रंग भरण्याचं काम भरत जाधव, अंकुश चौधरी, अनिकेत विश्वासराव, क्रांती रेडकर, सई लोकूर, मनवा नाईक, सई ताम्हणकर, पंढरीनाथ कांबळे या प्रसिद्ध कलाकारांनी केलंय.
