१ जुलैपासून पेंट्रोलचे दर ४ रुपयांनी उतरणार?

नवी दिल्ली दि.२७- आतंरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने पेट्रोलचा दर एक जुलैपासून चार रुपयाचे कमी होण्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिले आहेत.
 
आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने भारतीय तेल वितरक कंपन्या दर कमी करण्याच्या विचारात आहेत. मात्र, पेंट्रोलची किमत आतंरराष्ट्रीय बाजारापेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीवरच अवलंबून राहील, असेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

२३ मे रोजी पेंट्रोलमध्ये साडेसात रुपयांची दरवाढ झाली होती. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी दरवाढ होती. त्या वेळी देशव्यापी आंदोलनानंतर पेंट्रोलच्या दरात २ जूनला  दोन रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्या नंतर होणारी ही मोठी कपात असेल.