भुताच्या भीतीने पळाली मल्लिका

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत ही भूताला खूप घाबरत असल्याची माहिती कुठून तरी अभिनेता विवेक ओबेरॉयला समजली होती. त्यामुळे चित्रीकरणाच्या कामातून वेळ मिळाल्यावर त्याने एक दिवस मल्लिकाला निवांतपणे गाठले व त्याने मल्लिकाला भुताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली.

विवेक आणि मल्लिका सध्या कामालीस्तान स्टुडिओमध्ये किस्मत लव पैसा दिल्ली या चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहेत. हा स्टुडीओ स्वर्गीय अभिनेत्री मीनाकुमारी यांचे पती कमाल अमरोही यांनी उभारला आहे. विवेकने मल्लिकाला याठिकाणी मीनाकुमारीचा आत्मा भटकत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली.  हे ऐकूनच मल्लिका थोडी  घाबरली. त्याशिवाय विवेकने मल्लिकाला रात्री ज्याठिकाणी या चित्रपटाचे शुटींग होणार आहे त्या झाडाखाली भूत असल्याचेही सांगितले.

हे  ऐकून मल्लिका पूर्णपणे घाबरून गेली. तिने चित्रपटाचे दिग्दर्शक संजय खंडुरीला सांगून टाकले की मी रात्री त्या झाडाखाली शुटींग करणार नाही. ऐनवेळी मल्लिकाने नकार दर्शविल्याने शुटींग न करण्याचे कारण जाणून घेताना  त्यांना समजले की विवेकने झाडाखाली भूत असल्याचे सांगून तिची चेष्टा केली आहे. मात्र सर्व सहकारी कलाकारांनी समजूत काढूनही शेवटपर्यंत मल्लिका शुटींग करण्यास तयार झाली नाही. उलट सर्वजण मिळून चित्रीकरण करण्यास भाग पडतील या भीतीने ती स्टुडिओ सोडून पळून गेली.

Leave a Comment