भारतातही खेळायचा होता ९-११ चा खेळ

नवी दिल्ली,दि.२८ – अमेरिकेतील ९-११ सारखाच दहशतवादी हल्ला भारतातही करण्याचा कट लष्कर-ए-तैय्यबाने आखला होता, असा धक्कादायक खुलासा दहशतवादी अबू जिंदालने केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने ही माहिती उघड केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतातील उंच इमारती आणि मोठी धरणे दहशतवाद्यांचा टार्गेटवर होती. यासाठी अबू जिंदालला विमान उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. अबू जिंदालचा या खुलाशाने तपास यंत्रणांची झोप उडाली आहे. भारतात अबू जिंदालचा हा कट यशस्वी झाला असता तर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली असती. पोलिसांनी अबू जिंदालच्या या खुलाशानंतर देशातील उंच इमारती आणि धरणांची सुरक्षा वाढवली आहे. भारतात २००८ नंतर जेवढे बॉम्बस्फोट आणि अतिरेकी कारवाया झाल्या त्या सर्व घटनांमध्य अबू हमजाचा हात असल्याचा दावा महाराष्ट्र एटीएसने केला आहे.

अबू हमजा याने विदर्भातल्या आणखी ८ तरुणांना पाकिस्तानात नेऊन दहशतवादी प्रशिक्षण दिले आहे, अशी धक्कादायक माहिती एटीएसने दिली आहे. हे आठही जण सध्या भारतात आहेत आणि २००८ नंतरच्या अतिरेकी कारवायांमध्ये ते सक्रीय होते.

Leave a Comment