संगमांच्या बाबत ‘जैसे थे’चा मेघालय राष्ट्रवादीचा निर्णय

शिलॉंग, दि. २४ – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य पी. ए. संगमा यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला असला तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश शाखेने या संदर्भात ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिक टिक मेघालयात सध्या तरी चालू राहील अशी परिस्थिती आहे.

संगमांच्या राजीनाम्यामुळे मेघालयात कार्यकर्त्यांमध्ये द्विधावस्था निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या प्रदेश शाखेची बैठक झाली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कोनार्ड म्हणाले की, प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसने या विषयावर ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला असून अगाथा संगमा या  ‘यूपीए’ सरकारमध्ये मंत्री राहतील, असेही ठरविण्यात आले.