आगीसंदर्भांत दोषीवर फौजदारी करा-आमदार अबु आझमी

पुणे, दि. २५ – मंत्रालयामध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना न करणार्‍यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. कलकत्त्याच्या रूग्णालयामध्ये आग लागल्यानंतर दोषी अधिकार्‍यावर ज्या प्रकारे कारवाई केली तशीच कारवाई मंत्रालयातील आगी संदर्भांत दोषी असणार्‍यावर करणार्‍याची गरज. आगीकडे नागरिक संशयी वृत्ती पाहत आहे. असे मत समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली.

समाजवादी पक्षामध्ये  सय्यद अफसर आणि शंकरराव डावरेंनी त्याच्या कार्यकत्यांसह प्रवेश घेतला आहे. या संदर्भांत रेसिडेन्सी क्लबला आमदार अबु आझमी यांची पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अबु आझमी म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकारण कोरपॉरेट झाले आहे. राष्ट्रवादी व कॉग्रेस सत्तेसाठी आपसात लढत आहे. १९६६ पासून मार्मिक आणि सामनामधून प्रक्षोभक लिखाण करणार्‍याच्या विरोधात एकही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र आम्ही काही बोलल्यावर लगेच गुन्हा दाखल होतो.

राज्यातील मुसलमान आणि शेतकर्‍यावर अन्याय होत आहे. युपी सरकारने  धर्तीवर राज्यातील शेतकर्र्यांना सवलती देण्याची गरज आहे. मुसलमानांना संशयित आंतकवादी म्हणून पकडले जाते,  त्यांना कोर्टाने निदोष सोडले आहे. त्यांना सरकारने अब्रु नुकसान भरपाई दिली पाहिजे. युपी व बिहारमधील मुसलमान निष्कारण टार्गेट केले जात आहे. एम.एफ हुसेनप्रमाणे वादग्रस्त लिखाण करणारे तसलिम नसरीनला देशाबाहेर काढले पाहिजे. राज्यशासन अल्पसंख्यांकाच्या बाबत भेदभावाचे राजकारण करत आहे. अल्पसंख्यांकाच्या विविध योजनांसाठी शासनाने निधी कमी केला जात आहे. राज्य सरकार जर सिमीवर बंदी घालत आहे. तर ज्या  हिंदू संघटनेचे कार्यकर्ते बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक आहे. त्यांच्यावरही बंदी घालण्याची गरज आहे. रस्त्यावरील मंदिर व मशिद काढता कामा नाही.

पुण्यातील मुख्य मशिदचे रखडलेले कामाला परवानगी देण्यात यावी. इतर पक्षातील मुस्लीम नेते हे पक्षाचे गुलाम झाले आहे. त्यामुळे मुस्लीम नागरीकांच्या समस्या `जैसे थे ‘ आहे. प्रादेशिक पक्षामुळे कॉग्रेसचे अस्तित्व संपत चालले आहे. समाजवादी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.

Leave a Comment