एका लग्नाची दुसरी गोष्ट, राधासाठी घना एवढा बदलला

घना-राधातले खोटे रुसवे फुगवे दूर होतात आणि दोघेही पुन्हा नवीन सुरुवात करतात. राधा घनाकडे रहायला येते आणि तिला पहायला मिळतो अगदी वेगळा घनश्याम. घनाच्या बोलण्यामुळे राधा दुखावली गेली आहे.

याची जाणीव घनाला होते आणि न राहावून तो राधाची चक्क माफी मागतो. राधाही घनाचे हे बदललेले रुप पाहून सुखावते. आपल्या घरी जाताना ती पपांचा निरोप घेते तेव्हा तिची चांगलीच कान उघाडणी होते. दुसरीकडे राधा येणार या आनंदात घनश्याम चांगलाच तयारीला लागतो. स्वत: खोली आवरुन तो राधाच्या येण्याची जय्यत तयारी करतो. आल्यावर तिला सरप्राईज देण्यासाठी चांगलाच खटाटोपेही करतो.

बदललेला घनश्याम पाहून राधाला सुखद धक्काच बसतो.. घनश्याचे रोमॅण्टिक वागणे राधाला सुखावत असले तरी तिला बुचकळ्यात टाकते. प्रॅक्टिकल वागणारा घना खरा की राधासाठी झुरणारा घनश्याम खरा असा गोड प्रश्‍न राधाला पडतो… बघुयात येत्या काही दिवसात राधाला याचे उत्तर सापडते का?