असीनलाही मागणी वाढली

तसे पहिले तर दक्षिणात्य अभिनेत्र्यांनी चित्रपटसृष्टीत बरेच अधिराज्य गाजविले आहे. मात्र दक्षिणात्य अभिनेत्री असलेल्या असीनची गोष्टच वेगळी आहे. तिचे `गजनी ‘,  `रेड्डी’,  `हावूसफुल २’ हे चित्रपट हिट ठरल्याने या तिन्ही चित्रपटाने १०० कोटीची कमाई केल्याने सध्या असीनला मागणी वाढली आहे. तिच्याकडे सध्या अनेक हिन्दी चित्रपटाच्या ऑफर आल्या आहेत.

या तिच्या चांगल्या प्रदर्शनावर सध्या ती जाम खुश आहे. असे असताना मात्र सध्या अभिनेत्रीत सुरु असलेल्या स्पर्धेपासून मात्र ती दूर राहण्याचा विचार करीत आहे. असीन म्हणते आता पर्यन्त मी कधीच नंबर वनची अपेक्षा केली नाही व यापुढे कधी करणार नाही. मी उत्पादनात आघाडी घेतली आहे. आगामी काळात ही माझ्याकडून तसेच प्रदर्शन होईल असे अपेक्षा करणे ही चुकीचे वाटत असल्याचे तिने स्पष्ट केले.
असीन शिवाय सुरुवातीच्या दोन चित्रपटात १०० कोटींची कमाई करून सोनाक्षी सिन्हा हिने पण आघाडी घेतली आहे. याबाबत असिनाचे मत जाणून घेतले असता ती म्हणाली की सर्वच जण चांगल्या चित्रपटच्या  निर्मितीसाठी वेळ देत असतात. त्यामुळे मी कुणाशीच स्पर्धा करणार नाही.