
नागपूर, दि. २० – भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी साकोलीजवळ सौर ऊर्जानिर्मितीसाठी लागणार्या फोटो व्होल्टाईक सेल तयार करणारा तीन हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प उभारणार येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात एक हजार कोटी रुपयांच्या फॅब्रिकेशनच्या प्रकल्पाची निर्मिती केली जाईल. विदर्भातील या गुंतवणुकीने मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
