
सिंहासनावर आरूढ होऊन साठ वर्षे उलटल्याचा हिरक महोत्सव साजरा करणार्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथसाठी आणखीही एक खुशीची खबर असून तिचा तनखा तब्बल २० टक्कयांनी वाढविला गेला आहे. यंदा राणीला वर्षाला ३६ दशलक्ष पौंड इतका तनखा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे मंदीच्या झळा अनुभवत असलेल्या ब्रिटनमध्ये ब्रिटनवासिय महागाई, करआकारणी, बेकारी यांना तोंड देत असताना राणीचा तनखा मात्र वाढविण्यात आला आहे.
