ऐश्वर्या-अभिषेकची ’आराध्या’ मीडिया समोर

मुंबई,दि. २० – बॉलिवूडचा बादशहा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी ’आराध्या’ मीडिया समोर प्रथमच प्रगटली. पण ती आजी आणि आजोबांच्या वर्णनातुनच.

ऐश्वर्या आई होणार याबाबतची बातमी मीडियासमोर खूप उशिरा आली. आपण दादाजी होणार असे ट्विट करून अमिताभने ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचे कळविले. तेव्हापासून मीडियाची नजर ’जलसा’कडे लागली होती. आराध्याचा फोटोही मीडियाला उपलब्ध झाला नव्हता. मात्र, आराध्या कशी आहे, याची माहिती बच्चन कुटुंबियांकडून मीडियाला देण्यात आली.

आराध्याची आई ऐश्वर्याने सांगितले, आराध्या शांत आहे. तिच्यावर आजीची (अभिनेत्री जया बच्चन) सावली आहे. तर जया बच्चन नातीबाबत खूप खुश होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या नातीची योग्य ती काळजी तिची आई (ऐश्वर्या) आणि बाबा (अभिषेक) घेत आहेत. आराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याप्रमाणे उंच आहे. आराध्यामध्ये ऐश्वर्याची छबी दिसत आहे. आराध्या दिसायला सुंदर आहे. ती स्टॉबेरी सारखी दिसते. तिची आई तिला प्रेमाणे स्टॉबेरी म्हणते.

तिचे डोळे थोडे घारे आहेत. ती नेहमी हसमुख असते.तिला कोणाची नजर लागू नये म्हणून तिची काळजी घेतली जात आहे. हे आमच्यासाठी विशेष आहे. आराध्या ही भाग्यवान मुलगी आहे. तिने मिस वर्ल्ड ऐश्वर्या हिच्या पोटी जन्म घेतला आहे. ऐश्वर्या सध्या मुलीसोबत लंडन येथे आहे. याठिकाणी आराध्याची विशेष काळजी घेतली जात आहे. मुलीच्या जन्मानंतर ऐश्वर्याच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसून येत आहे, असे जया यांनी सांगितले.

Leave a Comment