
मुंबई दि २१ – बॉलीवूडचे एकेकाळचे सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या वृत्ताला त्यांचे व्यवस्थापक अश्विन यांनी आज दुजोरा दिला. ते पुढे म्हणाले की, राजेश खन्ना काही दिवसांपासून घरीच आहेत. ३-४ दिवसांपासून त्यांनी काहीही खाल्लेले नाही. त्यांची पत्नी डिंपल सतत त्यांच्यासोबत आहे. मुलगी रिंकीही त्यांना आजच भेटून गेली.
