आमदार शेगावकर यांचे मुंबईत निधन

मुंबई दि.२१ – रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी गृहनिर्माण मंत्री, आमदार प्रीतमकुमार शेगावकर यांचे आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. औरंगाबाद येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

प्रीतमकुमार शेगावकर यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षाचं अतोनात नुकसान झाले असल्याच्या भावना रिपाइंचे रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या.

पीईएसचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. प्रीतमकुमार शेगावकर यांना शनिवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांचा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीईएसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती देण्यासाठी शनिवारी शेगावकर यांनी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयालगत आनंद भवन या संस्थेच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकारांना संबोधित करतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. लगेचच त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.

Leave a Comment