
विरार, दि.२१ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाण्यानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरारजवळील खानिवडे टोलनाक्यावर बुधवारपासून १५ दिवसांच्या आंदोलनास सुरुवात केली. या काळात मनसे कार्यकर्त्यांकडून टोलनाक्यांवरून जाणार्या प्रत्येक वाहनाची; तसेच त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या पथकराची नोंद ठेवण्यात येणार आहे.
