आमिर अजूनही टिल्लूच

सलमान-शाहरुखच्या दुश्मनीप्रमाणेच सलमान-आमिरची दोस्तीही बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. आमिर आणि सलमान यांच्यातील घट्ट मैत्रीचा प्रत्यय वेळोवेळो येतो. सलामानने नुकत्याच एका केलेल्या एका ट्विटमध्येही ही मैत्री घनिष्ट असल्याचे दिसून येते. सलमानने या ट्विटमध्ये आमिरची प्रशंसा केली आहे. सल्लू म्हणतो, `वाह यार आमिर खान, टिल्लूने तर कमालच केली’, असे म्हणत त्याने आमिरला शाबासकी दिली आहे. आमिरच्या `सत्यमेव जयते’ या शोमुळे प्रभावित झालेल्या सलमानने त्याच्या भावना या ट्विटमधून व्यक्त केल्या. त्यात त्याने आमिरला टिल्लू असे संबोधले आहे. आमिर आणि सलमान यांनी एकत्र केलेल्या `अंदाज अपना अपना’ या चित्रपटात आमिरचे नाव टिल्लू ठेवण्यात आले होते. तेव्हापासून सलमान त्याला टिल्लू असेच संबोधत असतो.

Leave a Comment