
`शाळा’ या चित्रपटानिमित्ताने वेगळा प्रयोग करणारा सुजय डहाके आता `आजोबा’ या चित्रपटातूनही एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. या चित्रपटाचे नाव `आजोबा’ असले, तरी त्याची कथा वेगळी आहे. या चित्रपटाद्वारे एका बिबट्याची कथा सुजय सिल्व्हर स्क्रीनवर घेऊन येणार आहेत. हा सामाजिक विषय सिल्व्हर स्क्रीनवर मांडण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे, गिरीश कुलकर्णी, अमृता खानविलकर, ओम बुधकर मध्यवर्ती भूमिकेत आहेत. चित्रपटात एक नवा चेहराही झळकणार आहे. वन्य प्राण्यांसह चित्रीकरण करण्याची परवानगी भारतात नसल्याने चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण परदेशात केले जाणार आहे. चित्रपटात एका प्रशिक्षित बिबट्याचीही भूमिका असेल. `वन्यजीवांचे रक्षण करा’, असा संदेश या चित्रपटातून करण्यात येणार आहे.
