सागर विज्ञानात प्रचंड संधी

समुद्राचे आपल्या जीवनातले महत्त्व जाणले तर समुद्र आणि त्याचे शास्त्र यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टीने किती महत्त्व आहे तसेच आगामी काळात महत्त्व येणार आहे याची कपना येते. खरे तर पृथ्वीचा दोन तृतियांश भाग समुद्राच्या पाण्याने व्यापलेला आहे. काही मानव समूहांचे अन्न म्हणजे मासे आणि काही प्राणी हे समुद्रातच मिळतात. शाकाहारी लोक धान्य आणि भाज्या खात असले तरीही ते शेतातून प्राप्त होत असतात आणि शेती ज्या पावसावर अवलंबून असते तो पाऊस पडणे-न पडणे हे समुद्रावर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि त्यातून ढग तयार होतात. हे ढग कोठे, कधी आणि किती कोसळणार हे समुद्रावरून येणार्‍या वार्‍यांवर आणि समुद्राच्या पाण्यात तयार होणार्‍या विभिन्न प्रवाहावर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्यावरून मोठ्या प्रमाणावर प्रवास केला जातो. या सार्‍या गोष्टी पाहिल्या म्हणजे समुद्राचे शास्त्र आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येते. या शास्त्राला आगामी काळात तर अतोनात महत्त्व येणार आहे.

या शास्त्राचा सविस्तर अभ्यास करणारी संस्था नॅशनल इस्टियट्यूट ऑफ ओशनाग्राफी  ही गोव्यात आहे. सागर विज्ञान हा विषय किती महत्त्वाचा आहे हे या संस्थेने जाणले. १९६६ साल पासून ती या क्षेत्रात संशोधन करीत आहे. या शास्त्रात आपल्याला नेमके कोणते शिक्षण घ्यायचे आहे याचा एकदा निर्णय केला पाहिजे. कारण मरीन इंजिनियरिंग, मरीन केमिस्ट्री, मरीत बायालॉजी अशा या शास्त्राच्या शाखा करण्यात आल्या आहेत. या शाखांत सागराच्या निमित्ताने त्या त्या शास्त्राचा अभ्यास केला जातो. या शास्त्रात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट अशा पदव्या मिळवण्याची सोय अनेक संस्थांनी केलेली आहे. या क्षेत्रात अनेक नोकर्‍या उपलब्ध आहेतच पण त्यातल्या त्यात संशोधनाला फार वाव आहे. कारण, पृथ्वीवर  ज्या प्रमाणात समुद्राचे पाणी पसरलेले आहे त्या प्रमाणात अजून काहीच संशोधन झालेले नाही.

मात्र इंजिनियरिंग, अध्यापन, फिशरीज, अशा इतरही क्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्राचा आणि शिक्षणाचा प्रसार अजून म्हणावा तेवढा झालेला नाही. अजून शिक्षण संस्था निर्माण होत आहेत. त्यात शिक्षक आणि प्राध्यापकांची वानवा भासत आहे. भविष्यात ती अधिक भासणार आहे. त्यामुळे पदव्युत्तर पदवी मिळवणारांना आणि डॉक्टरेट करणारांना प्राध्यापक म्हणून चांगल्या पगाराच्या नोकर्‍या  मिळणार आहेत. विज्ञान विषयातल्या बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या विषयाशी संबंधित शिक्षण संस्थांत प्रवेश मिळू शकतो. त्या आधी प्रवेश परीक्षा दिली पाहिजे. काही शिक्षण संस्था अशा आहेत. अँग्लो ईस्टर्न मरीटाईम ट्रेनिंग इन्स्टि. प्लॉट क्र. ५० कर्मयोग बिल्डिंग, पारसी पंचायत रोड, स्टर्लिंग ऑटो समोर, सोना उद्योग जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९ फोन ०२२- २६८ ३७००७,६७२० ५६००, नॅशनल इन्स्टि. ऑफ ओशनोग्राफी लोखंडवाला रोड, ४ बंगला,अंधेरी (प.) मुंबई, ४०० ०५८ फोन क्रमांक ०२२ २६३५९६०५. याशिवाय केरळ आणि आंध्र प्रदेशातली या शास्त्राचे शिक्षण देणार्‍या दर्जेदार संस्था आहेत.

Leave a Comment