मराठी चित्रपट निर्मात्याने व्यवस्थापन शिकावे – डॉ. मोहन आगाशे

पुणे, दि. १९ – केवळ छंद किंवा हौस म्हणून चित्रपटाची निर्मिती करणार्‍यांमुळे चित्रपटांची संख्या वाढली. पण, चित्रपट व्यवसाय वाढला नाही. चित्रपट ही कला उत्तम व्यवस्थापन केल्याशिवाय विकता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक मराठी चित्रपट निर्मात्याने व्यवस्थापन शिकलेच  पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

प्रेरणा प्रकाशनतर्फे व्यवस्थापन शिक्षक आणि सल्लागार डॉ. दिलीप सरवटे यांच्या सिनेमा पाहावा काढून, या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि प्रकाशक हेमंत जोशी यावेळी उपस्थित होते. डॉ. दिलीप सरवटे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अनघा केसकर यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत जोशी यांनी आभार मानले.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, या पुस्तकाने मराठी चित्रपट व्यवसायाच्या भवितव्याविषयी चर्चेचा वाचा फोडण्याचे काम केले आहे. चित्रपट निर्मिती करणे म्हणजे एक प्रकारे विषाची परीक्षा घेण्यासारखेच असते. चित्रपट निर्मात्याला आपला चित्रपट विकण्याची कलाही अवगत असणे गरजेचे झाले आहे.

सुमित्रा भावे म्हणाल्या, चित्रपट व्यवसायामध्ये गुणात्मकता आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे. गुणात्मकतेचे मापन करण्यासाठी वेगळ्या आशय आणि विचारांची आवश्यकता आहे. माणसाला समृद्ध करण्याची शक्ती चित्रपटामध्ये आहे.

Leave a Comment