धोनी, सचिन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत

नवी दिल्ली, दि. २० – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा फोर्ब्सच्या १०० श्रीमंत खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

फोर्ब्स मासिकाने सोमवारी जाहीर केलेल्या यादीनुसार, गेल्या काही महिन्यात धोनीला मैदानात अपयश आले असले, तरी तो जगातील श्रीमंत खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. धोनी फोर्ब्सच्या यादीत ३१ व्या स्थानावर आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ७८ व्या स्थानावर आहे.

श्रीमंत खेळाडूंच्या यादीत मुष्टीयोद्धा फ्लॉइड मेवेदर हा पहिल्या स्थानावर आहे. त्याच्याकडे ८५ मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.

Leave a Comment