`फेसबुक फ्रेंड्स ‘ आपोआप ’टॅग’ होणार

नवी दिल्ली, दि. २० – फेसबुकने आता `फेस डॉटकॉम’ या साईटच्या कंपनीचे अधिकार विकत घेतले असून, या नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनीच्या साह्याने `क्लिक’ हे अप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे आता संगणकावरील डिजिटल फोटोंनाही `फेस रेकग्निशन’ मिळणार आहे.

फेसबुकवर कोणताही फोटो अपलोड केल्यास तो आपोआप `टॅग’ केला जाईल. त्याचप्रमाणे कमी प्रकाशातील अथवा खराब झालेला जुना असला, तरी असे फोटोही सहज या अप्लिकेशनमुळे ओळखला जाईल व टॅगही होईल. नवीन येणार्‍या आयफोनमध्येही हे अप्लिकेशन असणार आहे.

आता मोबाईल आणि डिजिटल कॅमेर्‍यामधून फोटो काढून फेसबुकवर अपलोड करणार्‍यांची संख्या जास्त आहे. `फेस डॉट कॉम’ या कंपनीने नुकत्याच आपल्या ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल किंवा डिजिटल कॅमेर्‍यातही या प्रकारची अप्लिकेशन्स वापरता येणार असून, त्याप्रमाणे सोशल नेटवर्किंग साईटवर फोटो टाकता येणार आहेत. फेसबुकच्या टीमबरोबर काम करताना, या साईटच्या युझर्सची जशी मागणी असेल त्या प्रमाणे आणखी काही अप्लिकेशन्स विकसित करण्यात येणार असल्याची माहिती ’फेस डॉटकॉम’ने आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

सध्या फेसबुकवर अपलोड होणार्‍यांपैकी अनेक फोटो हे पार्टी, घरगुती कार्यक्रम किंवा मित्रांबरोबर केलेल्या सहलीचे असतात. परंतु त्यातील काही फोटो अर्धवट आलेले अथवा धूसर असतात. त्यामुळे अशा फोटोत विशिष्ट व्यक्तीच टॅग होऊ शकत होती. परंतु आता या नवीन अप्लिकेशनमुळे फोटोतल्या सर्व व्यक्ती आपोआप टॅग होणार आहेत.

Leave a Comment