नव्या बाळाच्या स्वागताची तयारी करतोय अक्षय

गेल्या काही दिवसापासून चित्रपट अभिनेता अक्षय कुमार बराच व्यस्त दिसत आहे. त्याच्या घरी काही दिवसातच नवा पाहुणा येणार आहे. त्यामुळे सध्या अक्षय व ट्विंकल कमालीचे खुश आहेत. दोघेही दुसऱ्या मुलाच्या स्वागताची जोरदार तयारी करीत आहेत. या दोघासोबतच त्यांचा मुलगा अर्णव हा देखील तयारी करीत असल्याचे समजते. ट्विंकलची डिलेव्हरी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याने सध्या घरची सजावट करण्यात येत आहे.

त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून कुटुंबाला घेऊन अक्षय एका हॉटेलमध्ये शिफ्ट झाला आहे. घराच्या  सजावटीत अडथळा नको म्हणून अक्षयने हॉटेलेमध्ये काही दिवस मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ त्याच्या घराची दुरुस्ती केली जात नसून त्यासोबतच बाळासाठी नर्सरी तयार केली जात असल्याचे समजते.

अक्षय कुमार स्वतच्या कुटुंबासाठी जास्त वेळ देतो. त्यशिवाय दर वर्षी तो उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर जातो. मात्र यावेळेस त्याने हे सर्व दोरे कॅन्सल केले आहेत. ट्विंकलला प्रवासचा त्रास नको म्हणून त्याने हे विदेश दोरे कॅन्सल केले असल्याचे समजते. गेल्या काही दिवसापासून अक्षयने चित्रपटाच्या कामातून सुट्टी काढली असून तो सध्या हॉटेल मध्येच कुटुंबासाठी जास्त वेळ देत असल्याचे समजते.

 

Leave a Comment