टोकियो दि.१८- जपानच्या पूर्व किनार्यास सोमवारी सकाळी भूकंपाचा पुन्हा एकदा तीव्र धक्का बसला. भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती अमेरिकेतील भूगर्भभास्त्र सर्व्हेने दिली.

या भूकंपाने जीवित वा वित्त हानी नेमकी किती झाली हे लगेच समजू शकलेले नाही. जपानच्या वेधशाळेने म्हटले आहे की, या भूकंपाने त्सुनामी येण्याचा कोणताही धोका नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये.