पालखी लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ

पुणे, दि. १४ – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम यांच्या दर्शनासाठी पुणेकर भाविकांची लागलेली रीघ, अभंगाच्या तालावर डोलणारे वारकरी, अन वैष्णवजनांच्या गर्दीने फुललेले शहरातील रस्ते, यामुळे अवघी पुणेनगरी गुरूवारी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालख्या बुधवारी पुण्यात दाखल झाल्या. त्यामुळे पुणेकरांना आकाश ठेंगणे झाले होते. बुधवारी रात्रीपासून पुणेकरांची दर्शनासाठी रीघ लागली होती. गुरूवारीही असंख्य भाविक ज्ञानराजा व तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी पालखी विठोबा मंदिर व निवडुंग्या विठोबा मंदिर परिसरात येत होते.

दरम्यान, माउलींची पालखी शुक्रवारी सासवडच्या दिशेने रवाना होणार आहे. दिवे घाटाचा अवघड टप्पा याच मार्गावर आहे. तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

Leave a Comment