यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा; सोनिया भेटीनंतर शरद पवारांचे वक्तव्य

नवी दिल्ली , १४ –  देशाच्या सर्वोच्च पदाच्या अर्थात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरून एकीकडे यूपीए अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.

राष्ट्रपतीपदाच्या निवडीवरून राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसमध्ये उमेदवारांच्या नावावरून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी एकमेंकांवर झाडल्या जात आहे. तर दुसरीकडे युपीएने प्रणव मुखजींचे नाव राष्ट्रपतीपदासाठी जवळपास निश्चित केले आहे. त्याला तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी कडाडून विरोध दर्शविला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यूपीएला पाठिंबा दर्शविला आहे.

सोनिया गांधी आणि पवार यांच्यात गुरुवारी संध्याकाळी ’जनपथ’वर बैठक झाली. यावेळी अहमद पटेल हे देखील उपस्थित होते.

Leave a Comment