लिफ्टमध्ये अडकला रितेश

`क्या सुपरकुल है हम’ या चित्रपटाच्या सेटवर रितेश देशमुख चुकीच्या लिफ्टमध्ये चढला, ही चुकीची लिफ्ट पकडणे त्याला एवढे महाग पडले की, पुढचे ४० मिनिटे त्याला त्या लिफ्टमध्येच फसून राहावे लागले. सीननुसार रितेश लिफ्टमधून खाली जायचे होते आणि लॉबीत असलेल्या काही लोकांना भेटायचे होते; पण ठरवलेल्या लिफ्टऐवजी दुसर्‍याच लिफ्टमध्ये रितेश चढला. ज्या लिफ्टमध्ये रितेश चढला ती लिफ्ट खराब होती, त्यामुळे अर्ध्या रस्त्यात आल्यावर ती बंद पडली. इकडे क्रू मेंबर्स त्याची लिफ्टबाहेर वाट पाहत बसले; पण तो आलाच नाही, त्यामुळे तेही घाबरले. ४० मिनिटांनी रितेश लिफ्टमधून कसातरी बाहेर पडला.