येडियुरप्पा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बंगलोर दि.१४- बेकायदा खाण प्रकरणात अडकलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे केलेल्या अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायाधीशांनी फेटाळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ होण्याची इच्छा असलेल्या येडियुरप्पांवर आता कोणत्याही क्षणी अटकेची तलवार टांगली गेली आहे.

येडियुरप्पांबरोबरच त्यांचे दोन्ही पुत्र बी.वाय.राघवेंद्र आणि बी.वाय. विजयेंद्र तसेच जावई सोहनकुमार यांचेही अटकपूर्व जामीन सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्यंकट सुदर्शन यांनी फेटाळले आहेत. राघवेंद्र कर्नाटकातले खासदार आहेत.