कॅटरीनाने पाळला वाघ

हे वाचून सर्वांनाच थोडा धक्का बसला असेल पण हे खरे आहे. काही दिवसात तिचा एक था टायगर नावाचा चित्रपट येत आहे. यासाठी सध्या सर्वत्र तिचे पोस्टर झळकत आहे. या पोस्टर्सवर सध्या ती टायगर सोबत झळकत असल्याने सर्वांनाच तिच्या नवीन लुकचे आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे तिने वाघ पाळला आहे की काय असे सर्वाना वाटत आहे.

एक था टायगर  चित्रपटाच्या चित्रीकरणचे काम पूर्ण झाले असून कतरीनाचा  हा सलमान खान सोबतचा चित्रपट  एक धाडसी चित्रपट आहे. सध्या सर्वत्र तिच्या व सलमान खानच्या या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. या चित्रपटतील काम व टायगर सोबत दिलेली दृश्ये यामुळे चित्रपट चांगला गाजणार असे दिसते.  सध्या सर्वत्र तिचे पोस्टर झळकत आहे. या पोस्टर्सवर सध्या ती टायगर सोबत झळकत असून यावरील एक पंच ओळ मुळे तर ती जास्तच प्रसिद्ध झाली आहे. कॅटरीनाने वाघासोबत केलेली सलगी पाहता तिने या चित्रपटात वाघ पाळला आहे असे वाटते. बऱ्याच दिवसाने कॅटरीना व सलमान खान या जोडीचा चित्रपट येत आहे. चित्रपटचे काम सुरु असतानाच कॅटरीनाने सलमान सोबत प्रेम सबंध नसून केवळ मैत्री सबंध असल्याचे सांगून टाकल्यने सलमानची चांगलीच पंचायत झाली आहे. दोघामध्ये झालेल्या ब्रेकअप मुळे या चित्रपटातील केमेस्ट्री पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment