पुणे,दि.९ – पाच लाख वारकर्यांना देहू,आळंदी ते पंढरपूर वाटेने पांडुरंगाच्या दर्शनाला नेणारी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची वारी प्रस्थानासाठी तयार झाली आहे.

पुणे,दि.९ – पाच लाख वारकर्यांना देहू,आळंदी ते पंढरपूर वाटेने पांडुरंगाच्या दर्शनाला नेणारी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची वारी प्रस्थानासाठी तयार झाली आहे.
पालखी सोहोळा सुरु झाल्यापासूनचे हे ३२७ वे वर्ष आहे. रविवारी संत तुकाराम महाराज यांची पालखी रविवारी देहूवरुन प्रस्थान ठेवील.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोमवारी प्रस्थान ठेवील. मंगळवारी या पालख्यांची पुण्यात भेट होईल. या पालख्यांचा मुक्काम गुरुवार सकाळपर्यंत राहील. नंतर त्या पुढे रवाना होतील.