ग्रुप सी स्पेन वि. इटली हायव्होलटेज सामना तर आर्यलंड वि. क्रोएशिया भिडणार

गडन्सक-पोझनन, दि. १० –  युरो कप ग्रुप सीमध्ये स्पेनविरुध्द इटली हा हायव्होलटेज सामना आज गडन्सक येथील पीजीई अरेना या स्टेडियममध्ये पार पडणार आहे. स्पेनला या युरो कपचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण या लढतीत इटलीला ही कमी लेखून चालणार नाही.

२००८ युरो कप आणि २०१० फुटबॉल विश्‍वकप विजेती स्पेन ही या स्पर्धेतील फेव्हरेट टीमपैकी एक आहे. कुशाग्र गोलकिपर आणि कर्णधार इकेर कॅसिलस, जेरार्ड पिक, सर्जिओ रामोस, जॉडी अल्बा यासारखी बचावफळी, अड्रेस इनिस्टा, झॅवी हरनांडेझ्, फरनांडो टोरेस हे आक्रमक खेळाडूंमुळे स्पेन या स्पर्धेत पराभव करणे कठीण आहे.

याविरुध्द इटलीमध्ये संपूर्ण खेळ आक्रमक खेळाडू म्हणजेच मारिओ बालोटेली, फाबिओ बोरीनी यांच्यावर आहे. लिओनार्डो बोनुच्ची, क्रिस्तिअन मॅगिरा या बचावपटुंवर स्पेनचे आक्रमण थोपवण्याचे आव्हान असेल.

दुसरीकडे पोझननच्या म्युनसिपल स्टेडीअममध्ये ग्रुप सीमध्ये अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या प्रजास्ताक आयरलंड विरुध्द क्रोएशिया हा सामना रंगणार आहे. आयरीश संघात आक्रमक खेळाडू रॉबी कीएन केलेल्या स्थानिक स्पर्धेतील महत्वाच्या कामगिरी लक्षात घेता सार्‍याचे लक्ष या किएनवरच असणार आहे. त्याच्या साथीला केवीन डोएल, डेमिअन डफ हे चांगला खेळ करतील अशी आशा आहे.

विरुध्द क्रोएशियाचा संघ पहिला सामना खेळण्यापूर्वी दुखपतीनी ग्रासला आहे. स्लावेन बिलीक, इवो लिसेविक आणि वेड्रान कोरलुका हे खेळाडू जायबंदी असल्याने पहिल्या सामन्यास हा संघ पूर्णतयारीनिशी सज्ज आहे असे वाटत नाही.

क्रोएशिया कोणताही मोठा सामना जिंकला नाही पण त्यांना फुटबॉल खेळण्याचा अनुभव आहे. आयरीश संघासारखा नवखा संघ नसल्याने या सामन्यात हा संघ नांगी टाकू शकतो. पण कोएशिया संघाच्या दुखापतीचा फायदा आयरीश संघ घेऊ शकतो. एकूणच या रविवारी फुटबॉलप्रेमी सुपर सामन्यांची पर्वणी आहे.

स्पेन वि. इटली हा सामना भारतीय वेळेनुसार ९.३० तर आर्यलंड वि. क्रोएशिया १२.१५ ला चालू होणार आहे.      

Leave a Comment