_0.jpg)
अहमदनगर, दि. ९ – लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा देशात प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, कायदा हातात घेऊन केलेले कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. सक्षम जनलोकपालसाठी जनजागृती करण्यासाठी संपूर्ण राज्यातील जिल्हयांचा दौरा उरकून हजारे शुक्रवारी सायंकाळी नगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी या आपल्या गावी पोहचले.
