पद्मनाभ सजीव करणार व.पुं.चा `श्री’

महाराष्ट्राच्या काही लाडक्या साहित्यिकांपैकी एक असलेल्या व.पु.काळेंच्या `पार्टनर’ या कादंबरीवर आधारित श्री पार्टनर या चित्रपटात श्रीची भूमिका पद्मनाभ बिंदने साकारली आहे. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, चिं.त्र्यं. खानोलकर, प्रभाकर भावे यासारख्या नाटककारांच्या नाटकांमध्ये काम केल्यानंतर चंदेरी दुनियेत दाखल होताना व.पुं.च्या साहित्यावर आधारित असलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे ही भाग्याची गोष्ट असल्याचे पद्मनाभने सांगतो. या चित्रपटात आपण साकारलेले पात्र स्वभावाने खूप साधे असल्याचे सांगत पद्मनाभ म्हणाला की, हे पात्र खूप कॉम्प्लिक्स आहे. साधे सरळ आयुष्य जगणार्या श्रीला जीवनातील छक्के-पंजे ठाऊक नाहीत. जगण्याविषयी जराही आस्था नसलेल्या श्रीला पार्टनर भेटतो आणि त्याचे जीवनच पालटून जाते. पार्टनरची भूमिका सतीश पुळेकरांनी साकारली आहे. जुलै महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

Leave a Comment