सानिया-भूपतीचे आता लक्ष्य ऑलिम्पिंक

पॅरीस, दि. ८ – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धैच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत सानिया मिर्झा आणि महेश भूपती या भारतीय जोडीने जेतेपदावर नाव कोरले असून हे त्यांचे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या विजयानंतर दोघांनीही क्ले कोर्टवरुन ग्रास कोर्टंवर खेळून ऑलिम्पिंकमध्ये पदक मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यांच्याकडून या विजयानंतर ऑलिम्पिंक पदकाच्या ही आशा वाढल्या आहेत.

आता आम्ही क्ले कोर्टवरुन ग्रास कोर्टवर वळत आहोत. आमची लय अशीच राहिली तर अनेक ग्रँडस्लॅम जिंकू तसा एकत्र खेळण्याचाही निर्णय घेणार आहोत, असे सानिया-भूपती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.फ्रेंच ओपनमध्ये मिळालेला विजय सानियाचे दुसरं ग्रँडस्लॅम तर महेशचा १२ वा महत्वपूर्ण विजय आहे; आता त्याच्या नावे आठ मिश्र दुहेरीची जेतेपदे आहेत.

ऑलिम्पिंक मध्ये आम्ही एकत्र खेळण्याचा विचार करीत आहे. यासाठी आमची निवड झाल्यास भारताला टेनिसमध्ये पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे ही महेश याने सांगितले.

Leave a Comment