नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल

पुणे – येत्या डिसेंबरमध्ये बारामती येथे होणार्‍या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अखिल भारतीय नाट्यपरिषद पुणे शाखेच्यावतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे नाव सुचविण्यात आले आहे.

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यभरातील नाट्य परिषदेच्या शाखांच्या वतीने अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्यात येत आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये डॉ. जब्बार पटेल यांचे नाव एकमताने अध्यक्षपदासाठी सुचविण्याचे आले.

नाट्यपरिषेदेच्या कार्यकारिणीने डॉ.पटेल यांचे नाव एकमताने निश्‍चित केले असून आता त्याबाबतचे पत्र मध्यवर्ती शाखेकडे पाठवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या नावावर अध्यक्षपदाची मोहोर उमटली होती, तीच अपेक्षा यावेळी ही आहे.’ असे मत पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी व्यक्त केले.

Leave a Comment