लंडन ऑलिंपिक्समध्ये अवतरणार खुद्द जेम्स बाँड

लंडन दि.८- लंडन ऑलिंपिक्सची जोरदार तयारी सुरू झाली असून उद्घाटन सोहळा सर्व जगाला आकर्षित करणारा व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही केले जात आहेत. यंदाच्या लंडन ऑलिंपिक्समध्ये उद्घाटन सोहळ्याला खुद्द जेम्स बाँड म्हणजे जेम्स बाँड साकारणारा प्रसिद्ध नट डॅनियल क्रेग हजर राहणार आहे. लंडनची राणी एलिझाबेथ हिनेच जेम्स बाँडला ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावण्यास सांगितले असल्याचे समजते. मात्र डॅनियल खर्‍याखुर्‍या जेम्स बाँड प्रमाणे हेलिकॉप्टर मधून उडी मारूनच स्टेडियममध्ये येणार आहे. ही बाँड स्टाईलची एन्ट्री जगभरातील प्रेक्षकांच्या डोळ्यांसाठीची खास मेजवानीच असेल असे सांगण्यात येत आहे.

लंडन ऑलिंपिक्सची सुरवात २७ जुलैपासून होत असून उद्घाटन सोहळ्याची जबाबदारी स्लमडॉग मिलेनियममुळे चर्चेत आलेल्या डॅनी बॉयल या निर्मात्याकडे सोपविण्यात आली आहे. हा उद्घाटन सोहळा थरारक असेल असे सूतोवाच त्याने केले असून या सोहळ्यासाठी खास फिल्मही तयार केली आहे. अर्थात या फिल्ममध्ये क्रेगही असून त्याचे चित्रीकरण  बकींगहॅम पॅलेसमध्ये करण्यात आले असल्याचे व त्यासाठी राणीने खास परवानगी दिल्याचेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment