फ्रेंच ओपन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यफेरीत सानिया-भुपती यांचा प्रवेश

पॅरिस, दि. ६ – भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि महेश भुपती यांच्या जोडीने फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. या जोडीने अमेरिकेच्या क्वेता पेस्वेक व माईक ब्रायन यांचा ६-२, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

या विजयानंतर सानिया-भुपती जोडीने आपल्या दुसर्‍या ग्रॅन्डस्लॅम विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या आधी २०१० मध्ये या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन चा किताब पटकावला होता. या जोडीने क्ले कोर्टवर उत्तम खेळाचा नजराणा पेश करीत झेक-अमेरिकन खेळाडूंच्या जोडीला तासाभरातच धूळ चारली.

दुसरीकडे लिअंडर पेस आणि त्याची रशियाची साथीदार एलेना वेसिनेना अंतिम आठ जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी लिजेल हबर आणि मॅक्स मिरनी या जोडीशी दोन हात करणार आहेत.

Leave a Comment