रोमांचक लढतीत भारतीय ‘अ‘ संघाचा विजय

बार्बाडोस, दि. ६ – भारत ‘अ‘ संघाने पहिल्या प्रथमश्रेणी कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजला एक गडी राखून पराभूत केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय विजयाचा शिल्पकार कर्णधार चेतेश्‍वर पुजारा ठरला. कसोटीच्या शेवटच्या दिवशी त्याने कर्णधारपदास साजेशी ९६ धावांची खेळी करुन कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडच्या जागेवर खेळण्यास आपण सक्षम असल्याचेच सिद्ध केले.

या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसापासून भारतीय संघाच्या खेळात चढ-उतार पहायला मिळाले. वेस्ट इंडीजकडून मिळालेल्या १८६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची स्थिती ३ बाद २२ अशी होती. वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरने भारतीय फलंदाजाना धावा करण्यापासून बराच काळ रोखले होते. त्याने खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय फलंदाजावर शॉर्ट बॉल आणि बाउन्सरचा मारा करून त्यांना अक्षरशः त्रस्त केले. त्याने सामन्यात ५ गडी बाद केले.

धावफलक – भारत – ‘अ‘ २७७ (रोहीत शर्मा ९४, साहा ५६, कार्टर ५-६३) आणि ८ बाद १८८(पुजारा ९६, होल्डर ५-५५)
वेस्ट इंडीज-  ‘अ‘ २५२ (पेरमॉल ६६, अहमद ३-४३) आणि २१० (सिमन्स ५३, रोहीत शर्मा ४-४१)

Leave a Comment