इंग्रजी ‘कहानी’ला विद्याचा नकार

`डर्टी’ पिक्चर, `कहानी’ या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर अभिनेत्री विद्या बालन भलतीच फॉर्ममध्ये आली आहे. विद्याच्या `कहानी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद तर लाभलाच;

पण त्याचबरोबर या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले होते; पण चित्रपटांच्या जंजाळात गुरफटलेल्या विद्याने कहानी चित्रपटाच्या इंग्रजी रिमेकची शानदार ऑफर धुडकावून लावली आहे.

कहानी चित्रपटाचा दर्जा लक्षात घेता यश चोप्रांनी हा चित्रपट इंग्रजीमध्ये आणण्याचा विडा उचलला होता. कहानीच्या इंग्रजी रिमेकसाठी विद्यालाच घेण्याची चोप्रांची इच्छा होती; पण विद्यानेच ही ऑफर नाकारली.

Leave a Comment