
सलमानखान त्याची पूर्वीची प्रेमिका असलेल्या कॅटरिना कैफसाठी कधी काय करेल, हे सांगता येत नाही. कॅटरिनाने कितीही नाही म्हटले तरी सलमानचे तिच्यावरील प्रेम काही केल्या कमी होत नाही असे दिसते.

सलमानखान त्याची पूर्वीची प्रेमिका असलेल्या कॅटरिना कैफसाठी कधी काय करेल, हे सांगता येत नाही. कॅटरिनाने कितीही नाही म्हटले तरी सलमानचे तिच्यावरील प्रेम काही केल्या कमी होत नाही असे दिसते.
गेल्या काही दिवसांपासून सलमान व कॅटरिना या जोडीचा ‘एक था टायगर’ या चित्रपटाचे शुटिंग थायलंडमध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच कॅटरिनाने जाहीरपणे माझे व सलमानचे प्रेमसंबंध नसल्याचा खुलासा केला, त्यामुळे सलमान काहीसा नाराज होईल असे वाटत होते. मात्र त्याच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही.
‘एक था टायगर’नंतर कॅटरिना यशराज बॅनरच्या ‘धूम-३’ या चित्रपटात काम करणार आहे. तिच्यासोबत नायक म्हणून अमिरखान काम करीत आहे. या चित्रपटासाठी कॅटरिनाला थोडीशी तब्येत सुधारायची आहे. त्यामुळे सध्या ती शुटिंगच्या व्यतिरिक्त वेळेत फिटनेसवर लक्ष देत आहे. त्यासाठी तिने जीमही जॉईन केली आहे. हे सर्व करीत असताना तिला सलमान खान फिटनेस कोच म्हणून मदत करीत आहे.
थायलंडमधील चित्रीकरणाचे काम पूर्ण झाले की, सलमान तिला फिटनेसचे धडे शिकवत असतो. त्याप्रमाणे कॅटरिनाही सराव करीत असल्याने लवकरच कॅटरिनाची फिटनेसही आता सलमानसारखी व्हायला वेळ लागणार नाही. कॅटरिनाची तब्येत चांगली झाल्यानंतर ‘धूम-३’ चित्रपटात तिला सहजपणे अमिरखानचा मुकाबला करता येणार आहे.