इम्रानसोबत काम करण्यास करीनाचा नकार

करीना कपूर सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. तिला एकामागून एक चित्रपट मिळत आहेत व तिचे चित्रपट प्रेक्षकांना आवडत असल्याने हिट ठरत आहेत. त्यामुळे सध्या ती बॉलीवूडमधील टॉपची नायिका बनली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘हिरॉईन’ या बहुचर्चित चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने ती इतरत्र लक्ष द्यायला सध्या तयार नाही.

चित्रपटसृष्टीत तिने यापूर्वी रजनीकांत, शाहरूख खान, सैफअली खान, सलमान खान, अमिरखान व रणबीर कपूर या दिग्गज मंडळींसोबत काम केल्याने तिची वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे नवख्या असलेल्या इम्रान हाश्मी सोबत काम करण्यास तिने नकार दर्शविला आहे.

इम्रान हाश्मीची सध्या वेगळी क्रेझ आहे. त्याचा ‘जन्नत-२’ हा चित्रपट हिट झाला आहे. त्यामुळेच दिग्दर्शक करण जोहरने करिनाला इम्रान सोबतच्या आगामी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र करीनाने त्याच्या सोबत काम करण्यास नकार दर्शविला आहे.

करिनाने नकार दर्शविल्यानंतर करणने या चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेत्री दीपीका पादुकोनला ऑफर दिली आहे. आता ही इम्रान हाश्मी सोबत काम करणार की नाही याबाबत उत्सुकता लागली आहे. दीपिकाने होकार दिल्यास लवकरच या नव्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली जाणार असल्याचे करणने सांगितले.

Leave a Comment