भाजपचा दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी यशवंत सिन्हा अमेरिकेत

वॉशिंग्टन, दि. ३ – भारतात सार्वत्रिक निवडणुका होण्यास आणखी दोन वर्ष बाकी असली तरी राजकीय पक्षांनी मात्र आतापासूनच निवडणुकांसाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यासाठीच भारतीय जनता पार्टी (भाजप)ने देशातच नव्हे तर देशाच्या बाहेरही राजकारणी व्यक्तींचे समर्थन घेण्यास सुरूवात केली आहे.

यासंदर्भात विभिन्न मुद्यांवर पक्षाचे विचार स्पष्ट करण्यासाठी भाजपचे नेता आणि माजी परराष्ट्र मंत्री यशवंत सिन्हा यांनी अमेरिकी संसद सदस्यांना भेटण्यास सुरूवात केली आहे. आर्थिक सुधारणा आणि परराष्ट्र नितीसंदर्भात पक्षाचे विचार काय आहेत, याबाबत अमेरिकी संसद सदस्यांना माहिती करून देण्याचे काम सिन्हा करताहेत असा अंदाज लावला जात आहे.

अमेरिकी कॉंग्रेसला पक्षाचे विचार माहिती करून देणारे यशवंत सिन्हा दुसरे भाजपा नेता आहेत. यासंदर्भात अरूण जेटली यांनी देखील अमेरिकी संसद सदस्यांची भेट घेतली होती.  

Leave a Comment