सलमानच्या चित्रपटात सनी लियोन

बॉलीवूडमधील तिन्ही खानांसोबत काम करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. बॉलीवूडमध्ये करिअर करू इच्छिणार्या अभिनेत्रींना जर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर त्यांचे भाग्य चमकते.तसेच काहीसे पॉर्नस्टार सनी लियोनसोबत होणार आहे. सलमान खानसोबत काम करण्याची सनीची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

‘जिस्म-२’मध्ये काम करणार्‍या सनी लियोनला घेऊन एक चित्रपट बनवण्याच्या तयारीत सलमान असल्याची बातमी आहे. बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये सनी सहभागी झाली होती. हा शो सलमानने होस्ट केला, तेव्हाच सनीने आपल्याला त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले होते. आता ती इच्छा हा दबंग खान लवकरच पूर्ण करणार असे दिसतेय. सध्या तिच्याकडे ‘रागिनी एमएमएस-२’, ‘मर्डर-३’ हे चित्रपट आहेत. त्याशिवाय अनेक जाहिरातींमध्ये ती झळकत आहे. आता सलमान खान बरोबर काम करायला मिळाले आहे.

Leave a Comment