‘रियल टाईम कॉप’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा

मुंबई, दि. २९ – ‘गुंड व बदमाषांचा कर्दनकाळ’ म्हणून प्रसिद्धीस आलेले मुंबईचे माजी सहपोलिस आयुक्त वाय. सी. पवार यांच्या ‘रियल टाईम कॉप’ या आत्मचरित्राच्या इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सोमवार, ११ जून रोजी पार पडणार आहे.

‘रियल टाईम कॉप’ आत्मचरित्राचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबचे माजी पोलिस महासंचालक जे. एफ. रिबेरो आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम वालचंद हिराचंद हॉल, इंडियन मर्चंटस चेंबर, चर्चगेट येथे हा प्रकाशन सोहळा सायंकाळी ५.३० वाजता पार पडणार आहे. वाय. सी. पवार यांचे ‘रियल टाईम कॉप’ हे आत्मचरित्र पुण्यातील चिनार पब्लिशर्सद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच, याचे इंग्रजी भाषांतर प्रशांत तळणीकर यांनी केले आहे.

Leave a Comment