जेट एअरवेजला २९८ कोटींचा तोटा

मुंबई, दि. २५ – रूपयाच्या सततच्या अवमूल्यनामुळे, इंधन खर्चाची झळ खाजगी क्षेत्रातील जेट एअरवेजला बसली आहे. कंपनीला ३१ मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही अखेरीस कंपनीला २९८ कोटी १० लाख रूपयांचा तोटा झाला. २०१०-११ या आर्थिक वर्षाच्या या कालावधीच्या तुलनेत तोटयात १४० टक्के वाढ झाली. दरम्यान, कंपनीच्या एकूण उत्पन्नामध्ये २४.२ टक्क्यांची वाढ होऊन, ४६३८ कोटी नऊ लाख रूपयांचे उत्पन्न कंपनीने मिळविले. कंपनीचे इंधन बिल ४२.४ टक्क्यांनी वाढून, १८२२ कोटी पाच लाख रूपयांवर गेले असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment