पोलीस फौजदाराची पुण्यात आत्महत्या

पुणे, दि.२३ – आईच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने पोलीस दलातील एक फौजदार भानुदास शिंदे (वय ५७) याने सकाळी साडेदहा वाजता आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याची आई सेनापती बापट मार्गावरील रत्ना हॉस्पिटलमध्ये दाखल होती. तिचे वय ८५ होते. सकाळी दहा वाजता तिचे उपचार सुरु असतानाच निधन झाले. त्याचे दु:ख सहन न झाल्याने हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातच त्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या त्यातच तो गत:प्राण झाला. पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्वरीत घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

Leave a Comment