
इस्लामाबाद दि.२४- अमेरिकेच्या सुरक्षा विभागाला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे लपलेल्या ओसामा बिन लादेनचा शोध घेण्यात सहकार्य करणारे खैबरचे माजी सर्जन जनरल डॉ.शकील अफ्रिदी यांना पाकिस्तानातील न्यायालयाने ३३ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली असून त्यांच्यावर स्वदेशाशी गद्दारी करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
