
बंगळुरू, दि. २२ – नशीबाच्या जोरावर चार अव्वल संघांमध्ये पोहोचलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ बुधवारी मुंबई इंडियन्सला बंगळूर येथे सामोरा जाणार आहे. कर्णधार धोनीचे नशीब रूसले असे बोलेल जात होते. मात्र, संघाने बाद फेरीत प्रवेश केल्यानंतर सर्व निकष त्याने पुन्हा एकदा चुकीचे ठरविले. साखळी सामन्यांमध्ये मुंबईचे चेन्नईच्या संघाला दोनवेळा नमविले होते.
