पुण्यात शुक्रवारी अण्णा हजारे यांची जाहीर सभा

पुणे, दि. २१  –  सशक्त लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मुद्यावर जनजागृती करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राज्याच्या दौर्‍यावर असून शुक्रवार, २५ मे रोजी त्यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, पुणे जिल्हा कमिटी व अन्य सहयोगी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कर्वेनगरमधील भैरवनाथ मंदिर, मनपा शाळेच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती अण्णांचे पुण्यातील वकील मिलिंद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Comment