जागतिक बुध्दिबळ स्पर्धेत आनंदचे मनोधैर्य उंचावले

मॉस्को, दि. २२ – मॉस्को येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आठवी फेरी भारताचा ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद यांने आपल्या नावे करीत गेनफड बरोबर सुरू असलेल्या सामन्यात ४-४ अशी बरोबरी साधून सामन्यात रंगत आणली आहे. इस्त्रायलच्या बोरीस गेलफडने सातव्या फेरीत आनंदला नमविले होते. आठव्या फेरीत मिळविलेल्या विजयामुळे त्याच्या आत्मविश्‍वासात नक्कीच भर पडली असणार. विश्‍वनाथन आनंद एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी नवव्या दिवशी काळ्या मोहर्‍यानिशी खेळणार आहे.

वयाच्या ४३ व्या वर्षात खेळणारा ज्या गेलुंडची ही बहुदा शेवटची जागतिक स्पर्धा असेल असे दिसत आहे. बुधवारी नवव्या दिवशी फेरीत तो विजय मिळविण्याच्या इराद्यानेच उतरेल. एकंदर उद्याच्या फेरीत कोण कोण कशासाठी खेळतो, याकडेच सर्व भारतीयांचे लक्ष असेल आणि ही फेरीसुध्दा आनंदाने जिंकावी एवढीच इच्छा भारतीयांची असेल.

Leave a Comment