
बॉलिवूडमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच मी कांही नियम माझ्यासाठी घालून घेतले आहेत. चित्रपटात कोणत्याही कारणास्तव बिकीनी न घालण्याचा तसेच किसिंग वा अन्य प्रकारचे हॉट सीन्स न देण्याचा नियम हे त्यापैकीच आहेत असे सोनाक्षी सिन्हा हिने सांगितले आहे. ती म्हणते, मी वेगळ्या वातावरणात वाढले आहे. तसेच संपूर्ण कपड्यांत प्रेक्षकांनी मला स्वीकारलेही आहे. मग मीच माझ्यासाठी बनविलेले हे नियम बदलायचे मला कारण काय?
