प्रभूचा सिनेमा अजयसोबत

सलमान खानचा ‘वॉन्टेड’ चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर दिग्दर्शक-अभिनेता प्रभू देवा सध्या आपल्या `रावडी राठोड’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. रावडी राठोडचे प्रोमोज सध्या घराघरांत पोहोचले असून, रसिकांची उत्सुकता वाढली आहे.

याच कारणामुळे सुरुवातीला दक्षिणेकडे नृत्यदिग्दर्शक म्हणून लोकप्रिय झालेल्या प्रभूने सध्या बॉलीवूडपटांवर लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे. रावडी राठोडमध्ये अक्षयकुमारसोबत काम केलेल्या प्रभूने आता आपल्या आगामी सिनेमावर काम करायला सुरुवात केली आहे.

सलमान आणि अक्षयमागोमाग प्रभूच्या सिनेमासाठी अजय देवगणची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. `सिंघम’मधील अँक्शन भूमिकेद्वारे रसिकांची मने जिंकल्यानंतर अजय आता प्रभूच्या सिनेमातही अँक्शन भूमिकेत दिसणार आहे.

हा सिनेमा दक्षिणेकडे सुपरहिट ठरलेल्या `बाषा’ या तामिळ पटाचा रिमेक असेल. मूळ तामिळ सिनेमात रजनीकांतने मुख्य भूमिका साकारली होती. हिंदी सिनेमात ती भूमिका अजयने साकारावी, अशी प्रभूची इच्छा आहे. 

Leave a Comment